Saturday 23 March 2024

अइहौ होली खेलन एहि बार - हरी राम यादव

 अइहौ होली खेलन एहि बार


भरी रंग से हमरी पिचकारी,
बरसन को है एकदम तैयार।
यशोदानंदन कृष्ण कन्हैया,
अइहौ होली खेलन एहि बार।
संग ले अइहौ सब ग्वाल बाल,
औ ले अइहौ सब हुरियार ।
खूब मचाएंगे धमा चौकड़ी,
करेंगे रंगों की खूब बौछार।।

रान पड़ोसी सबको रंगेंगे ,
बहायेंगे अबीर-गुलाल बयार।
रंग रंगने में जो आड़े आयेगा
उसको हम देंगे धक्का मार।
गले मिलेंगे हम हमजोली,
बहा देंगे गिले, प्रेम की धार।
चरण छुएंगे सब बडकों का,
लेंगे आशीर्वाद हाथ पसार।।

बच्चों के संग बच्चे बनकर,
खूब मचाएंगे चीख पुकार।
छोटे बड़े का भेद न होगा,
होंगे होली में सब हुरियार।
ग्राम देवता सारे खुश होकर,
करेंगे रंगो की अविरल बौछार।
हे नटवर नागर गिरधारी तुम ,
आओ गांव हमारे यहि बार।।

      - हरी राम यादव
        7087815074

Thursday 29 February 2024

कलेकडे झुकलेली मराठी भाषा अधिक समृद्ध आहे. - दीपक करंजीकर

मुंबई : (रवींद्र मालुसरे ) - शास्त्राशी जोडलेलया भाषा आणि कलेशी जोडलेलया भाषा यामध्ये मराठी ही भाषा संपूर्णपणे कलेकडे  झुकते. ४८ वर्ण, व्यंजने, त्यातले स्वर, उच्चराधित शब्द त्यातून तयार होणारी बोली यातून तयार होणारे पर्यावरण मराठी भाषेशिवाय कुठेही नाही. त्यामुळे मराठीला मी बेलबुट्टीची भाषा समजतो. भारतावर ७०० वर्षात अनेक आक्रमणे होऊनही हा देश स्वतःची संस्कृती जपत सर्वाना सामावून घेऊन उभा आहे. तसेच मराठीचे झाले आहे.  आपली भाषा ही विस्तृत झाली आहे. मराठीतले अनेक शब्द इंग्रजीमध्ये प्रमाण म्हणून गेले आहेत. त्यामुळे मराठीच्या भविष्याबद्दलचा न्यूनगंड काढून टाका अहंगंड बाळगायला हरकत नाही मात्र आहे तो गंड बाळगायला हरकत नाही. सुंदरतेची आस असणारी महत्वाची देशातली भाषा म्हणजे मराठी भाषा आहे.भाषा हा आपल्या जगण्याचा अपरिहार्य भाग  आहे असे मला वाटते. असे प्रतिपादन विख्यात लेखक, अभिनेते आणि सुजाण विचारवंत दीपक करंजीकर यांनी व्यक्त केले. दादर सार्वजनिक वाचनालय आणि धुरू हॉल ट्रस्टस, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रम दादर येथे आयोजित करण्यात आला होता. ते पुढे असेही म्हणाले की,  जगात १० कोटी लोकांकडून बोलली जाणारी मराठी ही १० व्या क्रमांकाची भाषा आहे. भाषा दोन प्रकारे व्यक्त होते एक भाषेत पुस्तकं छापली जातात आणि ती बोलली जाते. आपली मराठी भाषा  १३२ देशांमध्ये पोहोचली आहे. दरवर्षी ५०० दिवाळी अंक आणि २००० पुस्तके निघतात आणि देशातल्या अनेक भाषांमध्ये काहींची भाषांतरे होतात. प्रत्येक क्षेत्रांत मराठी माणसाने जे काम केले आहे ते माईलस्टोन ठरले आहे. जी.  ए. कुलकर्णी यांच्यापेक्षा जगात कुणी मोठे नाही. शेक्सिपयरपेक्षा कानेटकरांच्या नाटकांचे विषय पाहिले तर त्यांचा पट मोठा आहे.


साहित्यप्रेमी आणि ज्येष्ठ स्तंभलेखक रविप्रकाश कुलकर्णी आपल्या भाषणात म्हणाले की, दिवाळी अंकांची कल्पना महाराष्ट्रातील काशिनाथ रघुनाथ मित्र यांना सुचली ती बंगालच्या दुर्गापूजा अंकामुळे असे अनेक जण आजही बोलताना व लिहिताना दिसतात , परंतु हे चूक आहे हे आता  सिद्ध झालेले आहे, तरीसुद्धा ही चूक दुरुस्त करण्याची तसदी आपले लोक का घेत नाहीत ही गोष्ट बंगाली आणि इंग्रजी दैनिकांतून ठसठशीतपणे यायला हवी. दिवाळीचा सण दिवाळी अंकांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. मराठी संस्कृतीत अढळ स्थान लाभलेल्या या दिवाळी अंकांच्या वैभवशाली परंपरेचा आढावा घेताना ते पुढे म्हणाले की,  ‘दिवाळी-दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ या उक्तींमधील आनंद दिवाळी साजरा करण्यातील अनेक गोष्टींइतकाच दिवाळी अंक हा त्याचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो.  गेली ११४ वर्षे मराठी साहित्याचा हा जागर अखंड होत आहे. तो वृद्धिंगत करतांना मराठी वृत्तपत्र लेखक संघाचाही खारीचा वाटा आहे. हे सातत्य इतर भाषांमध्ये फारसे घडताना दिसत नाही. दिवाळी अंकांनी मराठी साहित्यातील विविध प्रकार हाताळले असून, त्यातून अनेक लेखक-साहित्यिक नावारूपास आले आहेत.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षप्रमुख आणि विशेष कार्यअधिकारी मंगेश चिवटे यांना यावेळी संस्थेचे सन्माननीय सभासदत्व प्रदान करण्यात आले. चिवटे यांनी महाराष्ट्रातील  गोरगरिबांच्यासह सर्वांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्पनेतून आरोग्य कक्षाच्या माध्यमातून किती प्रमाणात आर्थिक मदत आणि  सर्वोतोपरी सहकार्य केले जाते याचा समग्र आढावा आपल्या भाषणात घेतला. त्याचप्रमाणे मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसेनानी आणि पत्रमहर्षी मनोहरपंत चिवटे यांच्या स्मरणार्थ दिवाळी अंकांच्या पुरस्कारासाठी ७५ हजार रुपयांची देणगी दिली. त्याचबरोबर संस्थेच्या जागेच्या अडचणींचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. विख्यात शल्य चिकित्सक डॉ प्रणय पाठारे यांनी बालमोहनमध्ये मराठी भाषेत शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टरकी करताना ती कसोशीने जपण्याचा प्रयत्न करतो यावेळी अनुभवाला येणाऱ्या गमती जमती त्यांनी आपल्या खूखूशीत भाषणात सांगीतल्या. संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी प्रास्ताविक केले.  गेली ४९ वर्षे दिवाळी अंक प्रदर्शन आणि स्पर्धेची परंपरा संस्थेच्या अडचणीच्या काळात कशी पार पाडली जात आहे याच्यासह संस्थेच्या आणि भविष्यातील कार्याचा समग्र आढावा त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात घेतला.
 यावेळी व्यासपीठावर दादर सार्वजनिक वाचनालयाच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती शुभा द कामथे, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त ऍड. देवदत्त लाड, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड उपस्थित होते.  'ग्रंथ तुमच्या दारी' या उपक्रमाचे जनक नाशिकचे  विनायक रानडे यांना ग्रंथालय चळवळीतील दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते "स्व. दत्ता कामथे स्मृती ग्रंथसखा' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अवतरण सकाळ (मुंबई ) साठी मनोरंजनकार' का र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंकाचा पुरस्कार ज्येष्ठ वृत्तसंपादक जयवंत चव्हाण आणि  मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित उत्कृष्ट अंक - मनोरमा संपादिका सौ शोभा श्रीकांत मोरे सोलापूर यांनी स्वीकारला.
अक्षर, वेदान्तश्री, सामना, उद्याचा मराठवाडा या संपादकांसह द इनसाइट या अंकाचे  संपादक पत्रकार सचिन परब यांनी तर संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्व विजया मनोहर कोळस्कर स्मृती अमृतप्रेरणा पुरस्कार काही दिवाळी अंकांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत ज्येष्ठ कामगार नेते स्व वसंतराव होशिंग स्मृती 'माझ्या बोलीभाषेचे मराठी साहित्य आणि व्यवहारातील स्थान' आणि पार्थ फाउंडेशन पुरस्कृत 'मराठी भाषेची चिंता आणि चिंतन' या विषयावर स्वबोलीभाषेत कुसुमाग्रजांना पत्र या दोन राज्यस्तरीय लेखस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर आणि कार्यवाह नितीन कदम यांनी केले. दिगंबर चव्हाण, दत्ताराम गवस, विजय ना कदम, सुनील कुवरे, राजन देसाई, श्रीराम मांडवकर, पंकज पाटील, दिलीप ल सावंत आदी कार्यकर्त्यानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

Thursday 15 February 2024

अक्कलपाडा धरण अर्धेच भरणे किती काळ सुरु ठेवणार?

दै.पथदर्शी,अग्रलेख

दि. 15/02/2023


अक्कलपाडा धरण अर्धेच भरणे किती काळ सुरु ठेवणार?


धुळे जिल्ह्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री  ना. अजित दादा पवार येवून गेले. त्यांनी  अक्कलपाडा धरणाची  माहिती घेतली. या धरणामध्ये शंभर टक्के पाणीसाठा का भरण्यात येत नाही ?  याबाबत माहिती घेतली. यात फक्त साडे चौसष्ठ टक्के पाणी भरले जाते. याचे कारण बुडीतातील अजून जादा जमीन भूसंपादित करावयाची राहिली आहे. ही बाब त्यांच्या निदर्शनास आली.  त्यांनी या विषयावर आठवडाभराचे आत मंत्रालयात बैठक घेऊन विषय निकाली काढण्याचे जाहीर केले होते.  दोन आठवड्यापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. परंतु याबाबत हालचाल जाहीर झालेली दिसत नाही. आता तर लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आठवडाभराच्या आत दिनांक 20 फेब्रुवारीपासून आचार संहिता  लागण्याची शक्यता आहे. एकदाची आचारसंहिता लागली, की कोणत्याही विकासाच्या प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यासाठी प्रशासन व शासन हात वर करून मोकळे होते. त्यामुळे वीस तारखेच्या आत अक्कलपाडा धरणाच्या अतिरिक्त भूसंपादनाचा विषय निर्णय होऊन मार्गी लागला नाही तर, याबाबत अजून वर्ष सहा महिने निर्णय होऊ शकणार नाही. आणि तसे झाले तर, अक्कलपाडा धरणामध्ये पूर्ण क्षमतेने यावर्षी पावसाळ्यात किंवा पुढील वर्षाच्या पावसाळ्यात देखील पाणी भरणे शक्य होणार नाही. लाखो कोट्यवधींच्या किंमतीचे पावसाळ्यातील पुराचे पाणी पांझरेतून असेच फुकट वाहून जाण्याचे बघणे, धुळेकरांच्या नशिबी राहणार आहे. यासाठी धुळे शहर व जिल्ह्यातील राजकारणातील प्रस्थापित नेते व इच्छुक नेत्यांनी तातडीने  ना. अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करणे आवश्यक झाले आहे. खरे म्हणजे आता जिल्हा प्रशासनाने देखील वेगवान हालचाली करण्याची गरज आहे. मात्र प्रशासन पातळीवर देखील सारीच सामसूम दिसते. या धरणाचे प्रचंड बुडित क्षेत्र आराखड्यात न दाखविणे ही घोडचूकच आहे. अक्कलपाडा धरण बांधण्याच्या आधी ज्या कुणी अभियंत्यांनी या धरणाचे आराखडे तयार केले, त्यांच्या बुद्धीची किंव केली पाहिजे. मात्र त्यांनी जाणून बुजुन हा उद्योग केला असेल, चांगल्या हेतूने हे केले असेल तर त्याचीही दखल घेतली पाहिजे. प्रारंभी या धरणाची मागणी आली तेव्हा  या धरणात पुरेसे पाणी येणार नाही, बुडितक्षेत्र जादा आहे, साईट नॅचरली फिजिबल नाही, अशा अनेक कुरापतींनी नोकरशाहीने  नकार  घंटा लावली होती.    धरण अन फिजिबल ठरू नये, या चांगल्या हेतूने त्यावेळी  त्यांनी मुद्दामहून चूक केली असेल, तर  त्यांच्या या भुमिकेचे स्वागतच केले पाहिजे. कारण त्यांनी मुद्दामहून धरणाचे बुडीत क्षेत्र कमी दाखवून त्यायोगे प्रकल्पाचा खर्च कमी दाखवून, हे धरण कसे योग्य आहे हे दाखविण्याचा  प्रयत्न केला असेल व त्यांच्या या  चलाखीचा  धरणास मंजुरी मिळविण्यासाठी उपयोग झाला असेल, तर ती गोष्ट धुळे तालुक्याच्या भल्यासाठी झाली. असे मानावे लागेल. अर्थात भूतकाळात जे काही झाले, ते झाले!  परंतु प्रथमच धरण शंभर टक्के भरण्यात आले. या वेळी धरणाच्या आधी संपादन केलेल्या जमिनीपेक्षा जवळपास शंभर कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी लागेल एवढी जादाची जमीन बुडीतात येत  असल्याचे लक्षात आले. पहिल्या वर्षी काही शेतकऱ्यांच्या शेतात बॅकवॉटर शिरले. त्याने पिकांचे नुकसानही झाले. परंतु अतिरिक्त शेतजमीन बुडीतात येत असल्याचे  अनेकांच्या लक्षात आले. अर्थात काही मंडळींना अतिरिक्त जमीन बुडीतात येणार आहे, ही बाब माहीत होती. त्यांनी आधीच स्वस्तामध्ये या पुढील  बडितातील जमिनी खरेदी करून ठेवल्या होत्या. यातील बऱ्याचशा मंडळींनी सर्वत्र जो प्रकार चालतो त्याप्रमाणे आंध्रातून मोठ-मोठी चार-पाच वर्षाची तयार फळ झाडे आणून लावून टाकली होती. जमिनीच्या उंच सखलपणामुळे ज्यांच्याजमिनीत बुडीताचे पाणी शिरत नव्हते, त्यांनी तर चक्क जेसीबी लावून चारी खणून आपल्या शेतामध्ये बुडीताचे पाणी कसे येईल, याची सोय करून घेतली. यामुळे झाले काय? बुडीतातील अतिरिक्त जमीन संपादन करावयाची म्हटल्यास नुकसान भरपाईचा खर्च जवळपास शंभर कोटीच्या वर गेला.  मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तर एवढा मोठा खर्च करण्यापेक्षा पावसाळ्यात पाटचारीने लहान मोठे बंधारे भरून घ्यावेत, असा पर्याय दिला.  यामुळे ही अतिरिक्त जमीन संपादनाची फाईल पडून राहिली. एवढ्या प्रचंड संघर्षातून बांधण्यात आलेल्या अक्कलपाडा धरणामध्ये तांत्रिक कारणाने केवळ पासष्ट टक्के पाणी भरले जावे, ही बाब सर्वसामान्य माणसाला पटणारी नाही. दरवर्षी पावसाळ्यात हे धरण भरून प्रचंड पाणी वाया जाते. त्यामुळे भूसंपादनाच्या विषयात काहीतरी मार्ग काढून हे धरण पूर्ण कसे भरले जाईल, हे बघितले जावे. हा विचार पुढे आला. त्यातूनच नामदार  अजित दादा पवार अक्कलपाडा येथे आले असता हा विषय त्यांच्याकडे मांडण्यात आला. त्यावेळी मागणी करताना, खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी सांगितले होते, की आजच्या घडीला वाया जाणारे एवढेच पाणी असणारे नवीन धरण बांधायला सुमारे आठशे कोटी रुपयांचा खर्च येतो. अतिरिक्त भुसंपादनासाठी शंभर कोटी रुपये ही रक्कम फार मोठी नाही. यासाठी अतिरिक्त भूसंपादनाचा मार्ग तातडीने मोकळा केला पाहिजे. खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांची ही मांडणी तार्किक आहे. यामुळे नामदार अजित दादा पवार यांनी देखील या विषयावर तातडीने मंत्रालयात मीटिंग लावण्याची इच्छा जाहीर केली होती. परंतु अद्यापही मीटिंग लागलेली नाही. आणि आचारसंहिता जाहीर होण्याचा काळ काही दिवसांवर आलेला आहे. अशा परिस्थितीत हा विषय तातडीचा समजून धुळ्यातील राजकीय नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंत्रालयाच्या संपर्कात राहून आचार संहिता लागण्याच्या आत या विषयावरील निर्णय करून घेणे गरजेचे आहे.  अन्यथा येता पावसाळा व त्या पुढील पावसाळा, दोन्ही पावसाळ्यात अक्कलपाडा धरण रिकामे ठेवून, पांझरेतून विनाकारण पाणी वाहून गेल्याचे बघणे, धुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या नशिबी राहील ! 


( कृपया फॉरवर्ड करा- योगेंद्र जुनागडे, धुळे )


व्हॉटस् अॅपवर अग्रलेख व अंक मिळण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/G0sT5YBzb2X4uGbn1RQRiF

पत्ता - सुयोग डिजिटल प्रिंटर्स जवळ, श्रीराम कॉम्प्लेक्स,साक्रीरोड, धुळे. Email - pathadarshi@gmail.com

आवाहन.... दै. पथदर्शी दररोज सकाळी आपल्या घरी टाकण्यास आपल्या रोजच्या पेपर विक्रेता बांधवास सांगा. व्हाटस् अॅपवर अंक मिळणेसाठी

दै. पथदर्शीचा व्हॉटस् अॅप क्र. 94234 97739 किंवा 75880 08025 सेव्ह करा आणि सेंड पथदर्शी’ व त्यापुढे आपले स्वतःचे नाव टाईप करून मेसेज  टाका.. फेसबुक वर दै. पथदर्शीचा अंक व अग्रलेखासाठी पुढील लिंकवर क्लिक करा व पेज लाईक करा .    

www.facebook/dailypathdarshi.com

Sunday 11 February 2024

'मराठी भाषेची चिंता आणि चिंतन' या विषयावर स्व-बोलीभाषेत कवी कुसुमाग्रजांना पत्र लिहा

 

'मराठी भाषेची चिंता आणि चिंतन' या विषयावर

स्व-बोलीभाषेत कवी कुसुमाग्रजांना पत्र लिहा

राज्यस्तरीय खुली लेख स्पर्धा

 

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मनसे विभागध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या पार्थ फाउंडेशन मुंबईच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर जन्मदिन आणि मराठी भाषा दिवस दरवर्षीप्रमाणे मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत धुरू हॉल, दादर सार्वजनिक वाचनालय येथे साजरा करण्यात येणार आहे. यावेळी ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.

यानिमित्ताने पार्थ फाउंडेशनच्या सहकार्याने मुबंईसह संपूर्ण महाराष्ट्रातील वृत्तपत्र लेखक, निवृत्त व सध्या कार्यरत असलेले प्राध्यापक, शिक्षक, साहित्यिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, मराठी भाषाप्रेमी यांच्यासाठी विनामूल्य 'मराठी भाषेची चिंता आणि चिंतन' या विषयावर या विषयावर स्व-बोलीभाषेत कुसुमाग्रज तथा कविवर्य वि वा शिरवाडकर यांना उद्देशून पत्रस्वरूपात राज्यस्तरीय लेख स्पर्धा 'आयोजित करण्यात आली असल्याची घोषणा संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केली आहे. कोणत्याही शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला किमान मातृभाषेत लिहिता वाचता यावं या संकल्पनेच वाटोळं करणारे एक धक्कादायक विदारक चित्र अहवालातून महाराष्ट्रात समोर आले आहे. ते म्हणजे - बारावीच्या विद्यार्थ्यांना दुसरीच्या मुलांचे मराठी वाचता येईना ! त्यामुळे शिक्षण क्षेत्रात  खळबळ उडाली आहे.  कोसकोसावर बदलणाऱ्या महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषांनी आपली मराठी भाषा समृद्ध झाली आहे.

 खेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते, कशीही असो ती 'मराठी' च म्हणून मराठी माणसाला आवडते. मराठी भाषेची सद्यस्थिती आपापल्या बोलीभाषेत व्यक्त करून स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी ६०० शब्दात लेख लिहावा यावा अशी अपेक्षा आहे, पहिल्या ३ जणांना रोख पारितोषिक,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व इतरांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील. 


युनिकोड फॉंट मध्ये टाईप करून दि २० फेब्रुवारी २०२४ पर्यंत लेख  chalval1949@gmail.com यावर पाठवावेत 

तसेच स्पर्धेचीअधिक माहिती, नियमावली व आगावू नोंदणी करण्यासाठी स्पर्धा समन्वयक दत्ताराम गवस  ९२२०६१५२४५ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर आणि पार्थ फाउंडेशनचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केले आहे. 


स्व-बोलीभाषा म्हणजे अस्सल कोल्हापुरी, चंदगडी, आगरी, नागपुरी, मराठवाडी,अहिराणी,  कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर, बगलांनी, नंदुरबारी, खाल्यांन्गी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी बाणकोटी, कोकणी, वऱ्हाडी, सोलापुरी किंवा महाराष्ट्रात इतर  असलेल्या अपेक्षित आहेत. 


Friday 2 February 2024

On this Day - Raj Kadyan

 The only way to get across is through.


 On this day, 02 Feb....


 1046 - The weather turns especially cold throughout Europe. Monks note in the Anglo-Saxon Chronicle that "no man alive...could remember so severe a winter." It is the first known record of the beginning of the 200 year period of exceptional cold, known as the "Little Ice Age."


1665 - British forces capture New Amsterdam, the centre of the Dutch colony in North America. The trading settlement on the island of Manhattan is to be renamed New York in honour of the Duke of York, its new governor.

 

 1795 - A prize of 12,000 francs was offered by the French government for a method of preserving food and transporting it to its armies. The winner was Nicholas Appert, a French chef who invented a way to can food. 

 

1869 - James Oliver invented the removable tempered steel plow blade.

 

1880 - The steamship SS Strathleven arrived in London with first successful shipment of frozen mutton from Australia. It had been chartered, fitted with air compression/expansion refrigeration equipment, and sent to Australia for a trial shipment of frozen carcasses. 

 

 1892 - The bottle cap with cork seal was patented by William Painter, Baltimore U.S. This  represented a major saving for the bottlers. (The cap was used until the 1970s, when cork in soft drink and beer bottle caps was considered unhealthy, so, manufacturers switched to cans and plastic, instead. Currently, caps used on bottles use plastic cap "liners", instead of cork).

 

1897 - A patent was issued for an ice-cream scoop invented by black American inventor, Alfred L. Cralle. His design of an "Ice-cream Mould and Disher" was made to be strong and durable, effective, inexpensive, able to keep ice cream and other foods from sticking and easy to operate with one hand.  The basic design is so efficient that it is seen still in use today.

 

1931 - 1st use of a rocket to deliver mail, Austria.

 

 1935 - The detective Leonard Keeler conducted the first use of his invention, the Keeler polygraph, or lie detector machine. Those examined were two criminals Cecil Loniello and Tony Grignano, who were convicted of assault at their trial where the results were introduced as evidence.

 

1947 - Beginning of polaroid photography. Edwin H. Land gave the first demonstration of his invention of instant photography.    

 

1958 -  Mrs Indira Gandhi elected president of the Congress party. 

 

1962 - Eight of the nine planets lined up for the first time in 400 years.

 

1965 - Government sanction was accorded to the Officers Training School for the start of Short Service Regular Commission.


1967 - US President Johnson orders consignment of 2 mil tons of food grains to be sent to India.


1971 - Idi Amin declared himself president of Uganda and ruled as one of the world's most brutal dictators for the next eight years.


1978 - The Indian National Congress (I) recognised as a national party and allotted the election symbol 'hand' (palm).


1982 - Geet Sethi becomes the youngest Indian to win the National Billiards' crown at Madras.


2013 - Shinzō Abe, Japan’s Prime Minister vows to defend the Senkaku Islands "at all costs".


2022 - More than one million Afghans have fled the country for Iran since October due to the country's economic crisis, according to immigration authorities threatening a new migrant crisis. 


Born....

 

 1915 - Khushwant Singh, novelist, lawyer, journalist and politician. Known for humour, sarcasm and an abiding love of poetry. Was decorated with the Padma Bhushan in 1974. But he returned the award in 1984 in protest against Operation Blue Star. In 2007 he was awarded the Padma Vibhushan.

 

Titbits....

 

 1802 - The first leopard to be exhibited in the United States was shown by Othello Pollard in Boston. It cost 25 cents to see the 'import from Bengal'.

 


 1852 - 1st British public men's toilet opens (Fleet St. London).


You may have known....  

 

A person is more likely to die from a giant meteorite hitting the earth than a small meteorite hitting just him.


Good morning. Have a nice day.

Raj Kadyan